स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची काँग्रेस तर्फे मागणी.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 12 नोव्हेंबर 2022 रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण कॉंग्रेस रोजगार कमिटीच्या सदस्यांनी आज JNPT मध्ये नव्याने येत असलेल्या जे. एम. बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून जसखार येथील बेरोजगार मेळाव्यातील जमा केलेले स्थानिक सुशिक्षित तरुण – तरुणींचे बायोडेटा व्यवस्थापनास सुपूर्त केले. स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी यावेळी केली.तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण -तरुणीनी आपले बायोडाटा उरण काँग्रेस रोजगार कमिटीकडे जमा करावेत असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here