पनवेल मध्ये भरणार योजनांचा महामेळावा.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि ११ नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे बाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल जयराज वडणे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ उपस्थित होते.
जयराज वडणे यावेळी म्हणाले की,नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या १८ योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून,३१ ऑक्टोबर पासून हे अभियान सुरू झाले आहे.१३ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगत आहोत असून यावेळी प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश,अलिबाग येथून सावंत मॅडम, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले. तर यावेळी मनोज भुजबळ यांनी विधी सेवा समिती, पनवेल करत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माध्यमांना अवगत केले.

चौकट
पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने तळोजा कारागृहात जाऊन तब्बल २८७५ कैद्यांची एका प्रश्नावली द्वारे मुलाखती घेऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
– ॲड मनोज भुजबळ.

 

चौकट

पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या २५ प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील.
– जयराज वडणे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *