धनगर समाजाने उच्च शिक्षणातून प्रगती साधावी. — आमदार सुभाष धोटे.


लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भंगाराम तळोधी येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण.

गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या धनगर समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, भारतीय समाज हा विविधतेत एकात्मता धारण करून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज देशातील प्रत्येक व्यक्ती आणि समाजाने शासकीय योजनांचा लाभ घेवून आपला सर्वांगीण विकास साधावा यासाठी प्रयत्न होत आहेत. धनगर समाज बांधवांनी देखील उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीयर, कलेक्टर अशा उच्च पदावर काम करावे. शेळी, मेंढी पालना सोबतच आपण इतर अन्य व्यावसायिक शिक्षण- प्रशिक्षण घेऊन प्रगती साधावी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. तसेच धनगर, कूरमार समाजाने घोंगडे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याबद्दल व बालगोपालांनी नृत्याच्या माध्यमातून समाजातील संस्कृतीचे दर्शन घडवल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांनी सर्वाचे आभार मानले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. संजय धोटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती सौ सुनीताताई येग्गेवार, सरपंच लक्ष्मीताई बालूगवार, धनगर समाजाचे अध्यक्ष मल्लाजी येग्गेवार, कृ.उ.बा. समितीचे उपसभापती अशोक रेचनकर, माजी प.स. सदस्य श्रीनिवास कंदनिरवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष विनोद नागपुरे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, सरपंच देविदास सातपुते, डोनु गरपल्लीवार, ग्रा. पं. सदस्य सहदेव रेड्डी, जयेश कोरपेनवार, नरेश चेनमेलवार, रवी पावडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, सरपंच सुनील झाडे, शालिक झाडे, राजू राऊत, रविंद्र पाल, विठोबा बावणे, भास्कर पोगुलवार, भानेश येग्गेवार, जोगेश्वरी राऊत, मनोज सिडाम, खुशालराव गणेशकर, गणपती येग्गेवार, लक्ष्मण येग्गेवार, अभियंता वैद्य सर, नैताम सर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरुपती येग्गेवार यांनी केले. संचालन कोमरा अम्मावार यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश दुर्कीवार यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *