जासई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीचे एस एस सी बोर्डाचे फॉर्म भरले.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 10 नोव्हेंबर 2022 शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई,तालुका उरण या विद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत असलेले आणि मार्च 2023 मध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे एस एस सी बोर्डाचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदुर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेछा देऊन आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासा शिवाय पर्याय नाही.कष्ट मेहनत करून आई वडिलांचे आणि शाळेचे नाव उंच करा असे मार्गदर्शन केले.अरुण जगे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला . रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस एस तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.दहावीच्या वर्गशिक्षिका मोकल एस एस,बाबर एस एम,हूद्दार एन एन,ठाकूर एस ए. यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे फॉर्म भरण्या संदर्भात मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास कमिटी सदस्य मधुकर पाटील,यशवंत घरत, धर्मदास घरत, जेएनपीटीच्या कामगार नेत्या श्रीमती मनीषा ताई म्हात्रे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ठाकूर एस. ए.यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *