चोरीच्या घटनेतील इनोव्हा कार पोलिसांनी केली हस्तगत

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 8 नोव्हेंबर 2020
दिनांक 22/10/2022 रोजी धनत्रयोदशी दिपावलीच्या पहिल्या दिवशी मॅजेस्टीक व्हीला, सेक्टर 50, द्रोणागिरी नोड, ता. उरण येथील एम गोल्ड ज्वेलर्समध्ये एक अज्ञात इसम अग्निशस्त्रासारखे दिसणारे रिवाल्वर घेऊन जबरी चोरी करण्याची इरादयाने दुकानात जाऊन दुकानात काम करणा-या मुलीस ‘‘ चुप बैठ,चुप बैठ’ असे बोलल्याने दुकानात हजर असलेल्या दुकान मालकाने सायरन वाजविल्याने दुकानात जबरी चोरीच्या इरादयाने घुसलेला इसम घाबरून दुकानातून बाहेर निघून दुकानाबाहेर असलेल्या इनोवा कारमध्ये बसून पळून गेला.
सदर बाबत उरण पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 299/2022 भादंवि कलम 398 अन्वये दिनांक 22/10/2022 रोजी दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे तपासकामी बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त जय जाधव, सह पोलीस आयुक्त शिवराज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 पनवेल, धनाजी क्षीरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि विजय पवार, सपोनि प्रकाश पवार, पोलीस उप निरीक्षक चंद्रहार पाटील नेम. उरण पोलीस ठाणे, सपोनि गळवे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, सपोनि निकम, न्हावाशेवा पोलीस ठाणे तसेच पोहवा/3518 अधिकारी, पोहवा/967 रूपेश पाटील, पोहवा/2013 घनश्याम पाटील, पोहवा/1744 शशिकांत घरत, पोहवा/944 नितीन गायकवाड, पोना/1576 मच्छिंद्र कोळी, पोशि/3048 सचिन माळशिकारे सर्व नेम. उरण पोलिस ठाणे यांनी कोणताही सुगावा नसताना आरोपीत हे घटनास्थळावर येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित करून सदर मार्गावरील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरीच्या इरादयाने अग्निशस्त्रासारखे दिसणारे रिवाल्वर घेऊन आलेला इसम ज्या इनोवा कारमधून पळून गेला होता त्या इनोवा कारचा नंबर एम एच 43 एक्स 7077 असा नंबर असल्याचे दिसून आले.
सदर गाडीचे फास्टटॅगला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरून गाडी मालकाची माहिती प्राप्त करून गाडी मालकाकडे दिनांक 22/10/2022 रोजी गाडी कोणास दिली होती याबाबत माहिती घेतली. तेव्हा सदरची इनोवा कार चालक नामे अंकुश अश्रुबा जाधव, वय 44 वर्षे, व्यवसाय-चालक, रा. 9 नंबर बिल्डींगच्या समोरील चाळ, बुध्द मंदिराचे बाजुला, संघर्षनगर, साकीनाका, मुंबई नं.400072 हा कल्याण अलिबाग भाडे असल्याचे सांगून गेला होता. चालक नामे अंकुश अश्रुबा जाधव यास दिनांक 30/10/2022 रोजी सानपाडा, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चैकशी केली असता त्याने पाहिजे आरोपी एजाज अब्दुल करीम चैधरी, रा. उल्हासनगर कॅम्प नं. 4 याचे सांगणेवरून इनोवा गाडी भाडयाने घेतली होती.
त्यानंतर दिनांक 22/10/2022 रोजी पहाटे 07.30 वा. चे सुमारास घटनास्थळी मॅजेस्टिक व्हीला येथे येऊन एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरी करण्याचे इराद्याने अटक आरोपी व पाहिजे आरोपी घटनास्थळी आले असल्याचे सांगितले.

सदर गुन्हयात आरोपीत नामे:-

1) अंकुश अश्रुबा जाधव, वय 44 वर्षे,व्यवसाय-चालक, रा. 9 नंबर बिल्डींगच्या समोरील चाळ, बुध्द मंदिराचे बाजुला, संघर्ष नगर, साकीनाका, मुंबई नं.400072,

2) बिलाल अब्दुल करीम चैधरी, वय 19 वर्षे, रा.मनिष भाटीया यांची चाळ, रूम नं. 2, काळूच्या दुकानाच्या मागे, सेक्शन नं.27, उल्हासनगर नं. 04, ता. उल्हासनगर, जि.ठाणे
आरोपी क्र. 1 व 2 यांना दिनांक 31/10/2022 रोजी 18.07 वाजता अटक केली असुन मा. न्यायालयाने दिनांक 08/11/2022 पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

3) शंकर बनारसी चैरासिया, वय 51वर्षे,व्यवसाय-इस्टेट एजंट, रा. रुम नं. 263, संगमनगर, चिखलवाडी, सॉल्ट पेन रोड, कंचन स्टोअर्सजवळ, वडाळा (पुर्व), अॅन्टापहिल, मुंबई नं.37 यास दिनांक 04/11/2022 रोजी 18.30 वा.अटक करणेत आली असून दिनांक 08/11/2022 पर्यत मा. न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

1) अटक आरोपीत नामे अंकुश अश्रुबा जाधव याचेवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत 29 गुन्हे दाखल आहेत.

2) पाहिजे आरोपीत नामे एजाज अब्दुल करीम चैधरी याचेवर मुंबई, नवी मुंबई,ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत तसेच गुजरात येथे असे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत.

3) पाहिजे आरोपीत अशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग याचेवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत एकुण 8 गुन्हे दाखल आहेत.

4) अटक आरोपी क्र. 2 याचेविरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र 42/2022 भादंवि कलम 324, 323 अन्वये गुन्हा दाखल आहे.

5) अटक आरोपी क्र. 3 याचेविरूध्द गुन्हे दाखल आहेत.
गुन्हयाचे तपासात आरोपीत यांनी वापरलेली 2,50,000/-रूपये किंमतीची इनोवा कार क्र. एम एच 43 एक्स 7077 हस्तगत करण्यात आली आहे.अशी माहिती सुनिल पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *