महिला पत्रकारासोबत वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध आय पी सी कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करावा. – रेखाताई ठाकूर

 

लोकदर्शन मुंबई👉 राहुल खरात

दि. ३नोव्हेंबर2022 – साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत विनयभंग केला आहे. सबब संभाजी भिडे विरुद्ध आय. पी. सी. कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या भिडे ह्यांनी आपल्या मनुवादी प्रवृत्तीच्या विधानाने साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे ह्यांच्या खाजगीपणाच्या विरुद्ध टिप्पणी केली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार ” कपाळावर टिकली लाव ” असा उर्मटपणा करीत, भारतमातेच्या नावावर काल मंत्रालयाच्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विनयभंग केला आहे. एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजगीपणाचे उल्लंघन होईल असे वर्तन करणे या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा तरतूद आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला स्वेच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे. संभाजी भिडे मात्र महिलांच्या ह्या अधिकाराला मान्य
करीत नाहीत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला
आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेतली. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली
लावली नाही या कारणास्तव तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला म्हणून भिडेला नोटीस बजावली आहे. कपाळावर टिकली नाही
म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२)
व १२(३) नुसार तात्काळ सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भिडे ह्यांनी केवळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला नाही तर नकार देताना उद्धट व अरेरावीपणे टिप्पणी केली व एका पत्रकार महिलेचा
विनयभंग केला आहे. विनयभंग प्रकरणात आरोपींना खुलासा मागण्याची कुठल्याही पद्धतीने तरतूद नाही. त्यामुळे खुलासे मागवून कागदोपत्री
कार्यवाही करण्यापेक्षा थेट पोलिसांना विनयभंग प्रकरणदाखल करण्याचे आदेश महिला आयोगाने देणे अपेक्षित होते. वंचित बहूजन आघाडी
भिडेच्या ह्या वक्तव्याचा निषेध करीत असून पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल करून भिडेला अटक करावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या
प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी व्यक्त केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *