Home
Home Breaking News अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपुर तर्फे नोटबुक चे वितरण

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपुर तर्फे नोटबुक चे वितरण

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे हे लक्षात घेता सभोवतालील गावातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळेतील 615 विद्यार्थ्यांना 3492 नोटबुक वितरीत करण्यात आले,नोटबुक चे वितरण अल्ट्राटेक सिमेंट आवारपुर चे युनिट हेड श्री. श्रीराम पी एस यांच्या हस्ते दिनांक 4 ऑगस्ट ला करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री. संदीप देशमुख, उपाध्यक्ष (तांत्रिक सेवा विभाग), श्री. नमित मिश्रा, उपाध्यक्ष (मानव संसाधन विभाग), श्री. सौदीप घोष, उपाध्यक्ष (माईन्स विभाग), श्री ललित देवपुरा, उपाध्यक्ष (वित्त आणि व्यावसायिक विभाग) श्री. नारायण दत्त तिवारी, श्री विपुल घायवते, श्री. किरण क‌रमरकर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केलेत .

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर प्रमुख श्री प्रतीक वानखेडे, श्री सचिन गोवारदिपे, श्री संजय ठाकरे व श्री देविदास मांदळे यांनी परिश्रम घेतले.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here