फिरोज शेख यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड* प्रदान करण्यात आला

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांचा नोकरी, करिअर मार्गदर्शन, सामाजिक सेवा, हिंदू मुस्लिम ऐक्य इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी नाना निवंगुणे यांच्या आंबी पानशेत येथील गृह प्रवेश कार्यक्रमांत सत्कार करण्यात आला. हा गृहप्रवेश पंचक्रोशीतील 30 विधवा माता भगिनी यांच्या हस्ते करुन सामाजिक समतेचा आदर्श ठेवला.
फिरोज शेख यांना शिक्षण, प्रशिक्षण, नोकऱ्या आणि करिअर मार्गदर्शन या क्षेत्रातील प्रयत्न आणि समर्पण यासाठी नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड* प्रदान करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अवमान प्रकरणी केलेल्या निषेध मोर्चात फिरोज शेख असंख्य मुस्लीम बांधवासोबत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी फिरोज शेख यांचा विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्या कार्याबद्दल सत्कार होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here