गडचांदूर येथील त्या विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला तडीपार करा – ,,,,,,,,,, महिलांची मागणी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

*गडचांदूर*

गडचांदूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारापासून वार्डातील महिलांना असुरक्षितता असून त्यामुळे महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे ,महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी त्या आरोपीस ताबडतोब अटक करून तडीपार करावी अशी मागणी महिलांनी ठाणेदार सत्यजित आमले यांना निवेदनाद्वारे केली आहे .

गुन्हेगार हा मागील दोन
वर्षा अगोदर वार्डातील मेश्राम नामक वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात गुन्हेगार असून. त्यातून सुटका झाल्यानंतर सदर गुन्हेगाराने गडचांदूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. शहरात अनेक महिलांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतरांनी स्वतःची प्रतिष्ठा जपत गुन्हा नोंदवीला नाही. परंतु दिनांक २६ /१०/२०२२ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास 2 नंबर वार्डातील आदिवासी महिलेवर जी वार्ड आरोपीने तिच्या घरी पती नसल्याचे पाहून, तिच्या घरात घुसून बलात्कार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु सदर महिलेने हिसका देऊन आरडाओरड केल्याने आरोपीने बलात्कार करून जीवे जीवे मारून टाकण्याचे धमकी देत तिथून पसार झाला. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही तर राक्षसी विकृती असलेल्या बल्लू उर्फ खालील शेख हा आरोपी वार्डात उभा राहून अश्लील चाळे करून महिला व मुलींचे अनेकदा छेड काढली. अशी व्यक्ती मानवी समाजाला काळीमा फासणारी असून. सदर आरोपीला तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद घेऊन,आजन्म जिल्हा बंदी करण्यात यावी , अन्यथा आमच्या परिसरातील महिलांचे कसे संरक्षण करायचे ते आम्ही आमचे पाहू व यात जर त्या राक्षसी प्रवृत्तीच्या इसमास काही हानी पोहोचली तर त्यास सर्वस्वी जबाबदार तो स्वतः व पोलीस प्रशासन राहील, अशा आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव महालिंग कंठाळे , सुरेश कांबळे मनसे तालुकाध्यक्ष, मन.वि.से तालुकाध्यक्ष ,पल्लवी ईश्वर तोडासे,ईश्वर तोडासे यासह असंख्य महिलानी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here