आम्ही गोवठणेकर ग्रुप तर्फे अपघातग्रस्त सर्वेश गावंड ला आर्थिक मदत

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे )

उरण दि 18 सप्टेंबर समाज्यात अजूनही माणुसकी आणि मैत्रीचे नाते घट्ट असल्याचे आज गोवठणे गावातील तरुणांनी दाखवून दिले.रामचंद्र विद्यालय आवरे येथे 12 वी मध्ये शिकत असलेल्या सर्वेश गावंड याचा काही दिवसांपूर्वी एका कार दुर्घटनेत अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो नवी मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.

सर्वेशची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने हॉस्पिटल खर्चाच्या उद्भवलेल्या समस्येसाठी त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवठणे गावातील आकाश पाटील व त्याचे मित्र साहील गावंड,रितेश पाटील, निरज पाटील, शुभम वर्तक, सुबोध पाटील, मन म्हात्रे, वेदांत म्हात्रे, चरण वर्तक यांनी आपल्या गोवठने गावात घरोघरी फिरून स्वइच्छेने गोवठणे गावातील ग्रामस्थांकडून तब्बल 31,500/- रुपये इतकी आर्थिक मदत जमा करून मदत गोळा करून सर्व तरुण आणि सुनिल वर्तक यांनी सर्वेशच्या घरी जावून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केली.याव्यतिरिक्त गावातील बऱ्याच युवकांनी सर्वेशला वयक्तिक मदत देखील केली आहे.मदत स्वीकारताना सर्वेशच्या कुटुंबीयांचे डोळे भरून आले होते. अगदी जड अंतःकरणाने त्यांनी या तरुणांचे आभार मानले. मदतीची बातमी समजताच सर्व स्तरातून या तरुणांचे कौतुक होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *