स्कॉर्पिओ पेटवून नुकसान करण्याचा प्रयत्न…

लोकदर्शन वालूर प्रतिनिधी👉 महादेव गिरी
⭕वालूर- आंबादास यादवराव भालेराव यांची स्कॉर्पिओ गाडी अज्ञात व्यक्तीकडुन पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वालूरात मंगळवारी (ता.१) रात्री अज्ञात व्यक्तीकडुन एक स्कॉर्पिओ गाडी पेटवून देऊन नुकसान करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे बुधवारी (ता.२) सकाळी निदर्शनास आले असून या बाबत अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
या बाबत माहीती अशी कि, वालूर (ता.सेलू) येथील रहिवासी आंबादास यादवराव भालेराव यांच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक-एम.एच.३८पी.१७७७) घरासमोरील बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूस पत्राच्या शेडमध्ये नेहमीप्रमाणे होती.मंगळवारी(ता.२) रात्री अज्ञात व्यक्तीकडुन सदर गाडीच्या उजव्या बाजूचे टायर,साईड ग्लास व दरवाजावर आग लाऊन पेटवून देण्याचा प्रयत्न केला.यामुळे गाडीचे टायर,साईड ग्लास व दाराचे जळल्याने मोठे नुकसान झाले.परंतू गाडी पेटवून मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न फसला.गाडीने मोठा पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी भीती परीसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
आंबादास भालेराव यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
चौकटीचा मजकूर
गेल्या एक वर्षांपासून मी स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली. माझ्यागाडीचे यापूर्वीही काच फोडून नुकसान करण्यात आले होते.या वेळी गाडी पेटवून नुकसान करण्याचा केलेला प्रयत्न हा आकास बुद्धितून झाला. आपण याबाबत पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *