दि. शाळेची फि न भरल्याने यू.ई.एस शाळेने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण. पून्हा असे प्रकार होणार नसल्याचे शाळा प्रशासनाकडून आश्वासन.

 

लोकदर्शन उरण 👉 .विठ्ठल ममताबादे.

दि. 15 सप्टेंबर शाळेची फी भरली नसल्याने शिक्षण घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याना अपमानास्पद वागणूक देत तासनतास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरण मध्ये घडला असून या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.उरण शहरात अनेक नामांकीत इंग्रजी माध्यम शाळापैकी बोरी येथील यूईएस ही शाळा असून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत गरिब श्रीमंत अशा सर्वच स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नसल्याने वर्गासमोर तासनतास ताटकळत ठेवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. दि 15/9/2022 रोजी नेहमीप्रमाणे विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत गेले होते.मात्र फी न भरल्याने त्यांना वर्गात न घेता वगाबाहेर वसविण्यात आले.सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंत शाळा प्रशासनाचे शिक्षक अथवा प्राचार्य किंवा शाळा व्यवस्थापणची एकही जबाबदार व्यक्ती तिथे बघायला सुद्धा आले नाहीत . असा प्रकार घडला असता शाळा व्यवस्थापनाच्या कोणत्याही प्रतिनिधिंनी याबाबत कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखविली नाही. घडलेला सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळेत धाव घेतली व घडलेल्या निंदनीय व बेकायदेशीर प्रकाराबाबत युईएस प्रशासनाच्या शिक्षक,प्राचार्यांना जाब विचारला असता विदयार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले नसल्याचे प्राचार्य सिमरन दहिया यांनी सांगितले.पालकाचा संताप बघून व घडलेली घटना लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गाबाहेर असल्याचे समजताच वर्गा बाहेरील विद्यार्थ्यांना त्वरित आत(वर्गात )घेण्याचे आदेश प्राचार्य यांनी शिक्षकांना दिले.मात्र सदर असा प्रकार घडल्याचे मला माहित नाही असे सांगत प्राचार्याने हात वर केले.विदयार्थ्यांना सकाळी 7 ते 10:30 या वेळेत वर्गाबाहेर ठेवल्याने पालकांच्या डोळ्यात पाणी आले.आणि त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. 5 वी ते 10 वर्गात शिकणाऱ्या एकूण 18 विदयार्थ्याना वर्गाबाहेर बसविण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते जयंत गांगण यांनी यूईएस शाळा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या कानावर फोन करून ही बाब टाकली असता लगेच ते शाळेत हजर झाले. मिलिंद पाडगावकर यांनी घडलेला सर्व प्रकार समजून घेउन पालकांची प्रत्यक्ष समस्या समजून घेउन सदर घटना निंदनीय असून अशी घटना पुन्हा होणार नसल्याची कबूली उपस्थित पालकांना दिली.दरम्यान PTA (पालक शिक्षक संघटनेचे )व्हाईस प्रेसिडेंट प्राजक्ता गांगण यांनी पालकांशी अपशब्द वापरनाऱ्या व या सर्व घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेले शिक्षक व प्राचार्य यांना निलंबित करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याकारणाने त्यांना वर्गाबाहेर अपमानास्पद वागणूक देत बसविण्यात आले. हा निर्णय कोणाचा होता असे पालकांनी शिक्षकांना विचारले असता शिक्षकांनी आम्हाला वरून आदेश असल्याचे सांगितले. शाळा प्रशासनाला विचारले असता आम्ही विद्यार्थ्याना वर्गाबाहेर बसविण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगितले. एकंदरीत शिक्षक व प्राचार्य यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तरे पालकांना मिळाले नाही. उलट उडवा उडवीची उत्तरे पालकांना मिळाली.विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर कोणी बसविले हे कोणीच सांगायला तयार नसल्याने घडलेला प्रकार निंदनीय असून उपस्थित सर्व पालकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. फी संदर्भात अशा घटना यू.ई.एस शाळेत वारंवार होत असून अशा घटना पुन्हा होउन नयेत यासाठी गट शिक्षणाधिकारी,शिक्षणमंत्री यांनी या संबंधित शिक्षक व प्राचार्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली.

कोट (चौकट ):-

सदर समस्या माझ्या निदर्शनास आल्याबरोबर मी स्वतः घटना स्थळी जातीने हजर राहून त्वरित पालकांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली.विदयार्थ्याना फी न भरल्याने वर्गाबाहेर ठेवण्यात आले होते असे पालकांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराची आम्हालाही कल्पना नाही. सदर घटनेचे आम्ही कोणीही समर्थन करणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फी भरण्यासाठी कोणत्याही पालकांवर, विद्यार्थ्यांवर दबाव टाकलेला नाही. भविष्यात पालक व विदयार्थ्याना कोणताही शारिरीक मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेवू
-मिलिंद पाडगावकर
यूईएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष

फी भरण्यासाठी पालकांना सवलत दिली आहे. शाळा व्यवस्थापन कडून शाळेतील विद्यार्थी पालकांना कोणताही त्रास दिला जात नाही. पालकांना कोणतेही समस्या असल्यास त्यांनी प्राचार्य सिमरन दहिया किवा व्यवस्थापन समितीच्या सभासदांना संपर्क साधावे त्यांची समस्या त्वरित सोडविण्यात येईल. शाळा व्यवस्थापनाने कोणावरही अन्याय केलेला नाही.
– चंद्रकांत ठक्कर
यूईएस शिक्षण संस्थेचे खजिनदार

यू. ई. एस शाळेत विद्यार्थ्यांना, पालकांना प्राचार्य सिमरन दहिया व शिक्षकांकडून कधीच व्यवस्थित उत्तरे दिले जात नाहीत. विद्यार्थी व पालकांना नेहमी उडवाउड‌वीची उत्तर दिली जातात. अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला की त्यांचा आवाज दाबला जातो.पालकांच्या विदयार्थ्यांच्या असलेल्या समस्या जाणून घेतल्या जात नाहीत. उलट फी भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर दिले जाते. आता तर विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने त्यांचा शारिरिक मानसिक छळ करत मानवी हक्कांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर ताटकळत ठेवले.हा प्रकार, अशोभनीय निंदनीय असून प्राचार्य व संबधित शिक्षकांवर कारवाई झालीच पाहीजे व असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी शाळा व्यवस्थापनाने काळजी घ्यावी.
– प्राजक्ता गांगण
पीटीए व्हॉइस प्रेसिडेंट (पालक शिक्षक संघटना )

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *