



लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
हळू हळू सर्वोत्तम वक्ता, लक्षवेधी विचारवंत, धुरंधर राजकारणी आणि ख्यातनाम साहित्यीक म्हणून अमरसिंहबापू देशमुख सारे जहाँत ओळखले जातील . दशकभरातच याचा प्रत्यय सर्वांना येईल . आटपाडीच्या तीन आणि आटपाडीशी संबधीत आणखी दोघांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविले . भविष्यात अ .भा . म . सा . संमेलनाचे अध्यक्ष होतील अशी पात्रता असणाऱ्या श्री . राम नाईक, श्री . राजीव खांडेकर यांच्या पंक्तीत अमरसिंहबापू देशमुख हे ही सामील झाल्याचे पहायला मिळेल . या त्रिमुर्तीची पुढील वाटचाल या दिशेने व्हावी आणि होईल हीच निखळ अपेक्षा .
एक लाख पुस्तके वाचण्याचा अभिनव उपक्रम बाबासाहेब देशमुख या शिक्षणमहर्षी लोकनेत्याच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करण्याचा मोठा संकल्प ध्येयवेड्या , नवनवीन संकल्पनांच्या पुरस्कर्त्या अमरसिंहबापू देशमुख यांनी करून तो पुर्णत्वास नेण्याचा चंग बांधला आहे . मरगळीस आलेल्या या वाचन चळवळीत “जान” घालण्याचा बापूंचा प्रयत्न सर्वार्थाने यशस्वी होईलच यात तीळमात्र शंका नाही . अभ्यासपूर्ण, सुक्ष्म, काटेकार नियोजनाने जाणारे “बापू” सर्वंच क्षेत्रात बाबासाहेब देशमुख यांना साक्षात उभे करत असल्याचे भासते . बाबासाहेब देशमुख दादांच्या भक्कम, व्यापक आणि ध्येयवेड्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातल्या हजारो हातांच्या, हजारो मराठी भाषा प्रेमींच्या भक्कम पायावर बापूसाहेब हे वाचन चळवळीचे लाख मोलाचे शिवधनुष्य लिलया पेलतील . या उपक्रमाची, *बापूसाहेब* या नावाच्या अवलियाची दखल राज्य – राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित घेतली जाईल . सैतानी वृत्तीचा माणूस सर्वार्थाने माणूस बनविण्याचा स्वतंत्रपुराचा १९३९ सालचा आटपाडीत सुरु झालेला प्रयोग बापुसाहेब सर्वच माणसांसाठी वेगळ्या पद्धतीने सारे जहाँत नेत आहेत . औंधाचे राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंत प्रतिनिधी, बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधी, अभियंता भारतानंद उर्फ मॉरीस फ्रेडमन, थोर साहित्यीक ग .दि . माडगूळकर आण्णा, व्यंकटेशतात्या माडगूळकर, शंकरराव खरात, ना .सं . इनामदार, म .गो . तथा बाबा पाठक वगैरे शेकडो माणदेशी रत्नांचा आत्मा ” इन्सान ” बनविण्याचा कृतीशील प्रयोग राबविणाऱ्या बापूसाहेबांना धन्यवाद देईल – दुवाँ देईल . बापुसाहेब तुम्हांला, वाचन चळवळीसाठी परिश्रम घेत असलेल्या आणि मन मस्तक मजबुत करणाऱ्या चळवळीत पुस्तक वाचण्यासाठी झोकून दिलेल्या सर्वांना करोडो शुभेच्छा .
*सादिक खाटीक आटपाडी जि . सांगली .*
प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .