गडचांदूर येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने विकासपुरुष, लोकनेते, नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार, व लाडुतूला

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

महाराष्ट्राचे लाडके नेते, चंद्रपूर जिल्ह्याची शान म्हणून कार्यतत्पर, विकासात्मक दृष्टिकोनाचे लोकनेते आदरणीय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अनेक विकासात्मक कार्याचा गौरव व्हावा आणि राज्य मंत्रिमंडळात वने,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्रीपदी निवड झाल्यामुळे त्यांचा स्वागतपर सत्कार करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाडीच्या वतीने गडचांदूर येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे गडचांदुर शहरात आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी आणि समस्त शहरवासीयांनी फटाकांच्या आतिषबाजीसह, धुमधडाक्यात,जोशपूर्ण वातावरणात बस स्टॉप पासून कार्यक्रम स्थळापर्यंत रॅली काढली…
यादरम्यान उपस्थितांचा उत्साह आणि जोश बघण्यासारखा होता…

प्रथमता आदरणीय भाऊंची लाडूतुला करून सत्कार करण्यात आला…त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण, प्रतिमेची पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली… यावेळी व्यासमांचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.हंसराज भैय्या अहिर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री) श्री देवरावजी भोंगळे (जिल्हाध्यक्ष भाजपा तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर,) श्री सुदर्शन
जी निमकर( माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र,)
श्री.रामसेवक मोरे नगरसेवक गडचांदूर, श्री अरुण डोहे नगरसेवक, सौ. अलकाताई आत्राम जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, सौ.विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष गडचांदुर, आदीसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते….

मान्यवरांचा पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आलं, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कारमूर्ती नामदार श्री. सुधीरभाऊंचा सत्कार करण्यात आला.. सोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. हंसराज भैय्या अहीर यांचाही सत्कार करण्यात आला…

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचांदूरचे भाजपा शहर अध्यक्ष माननीय श्री.सतीशभाऊ उपलेंचवार
यांनी आपल्या प्रास्ताविकातून गडचांदूरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामाची भाऊंकडून मागणी केली… एक प्रशस्त सांस्कृतिक समाजभवन अथवा शेतकरीभवन शहरात असावं, त्यासाठी भाऊंने विशेष लक्ष द्यावं, अशी आशा व्यक्त केली.

सत्कारमूर्ती नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या संबोधनातून कार्यकर्त्यांना जागृत करण्याचा निरंतर प्रयत्न केला… आपल्याला कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश बघून खूप आनंद झाल्याचं सांगितलं…आपण केलेल्या विकासात्मक कार्यासोबतच गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारने केवळ अनेक समस्या निर्माण केल्या, जनतेला हवालदिल केलं, विकासात्मक कार्याचा बोजबारा केला असं मत व्यक्त केलं..

आपल्याला केवळ स्वार्थापोटी मंत्रिपद नको तर पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची अशी आपली नेहमीच भूमिका राहिली… विकास हाच आपला ध्येय असून विकासाच्या कार्यासाठी नेहमी तत्पर असल्याचं विशद केलं…
खास गडचांदूरकरांनी केलेली मागणी त्यांनी मान्य करून एक प्रशस्त जागा उपलब्ध करून द्या त्यावर मी आपल्या इच्छेनुसार सुसज्ज, सुशोभित, वातानुकूलित, सांस्कृतिक समाज भवन मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली.

श्री हंसराज भैया अहिर यांनी आपल्या अध्यक्ष भाषण मध्ये आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर हल्लाबोल केला… सुधीरभाऊंच्या कार्याची आणि मंत्रीपदाची प्रशंशा केली…
युतीसह निवडून आलेल्या शिवसेननी भाजपाला दगा दिला… त्यातच त्यांना त्याचे फलित म्हणून आज शिवसेना बॅकफुटवर गेली, शिवसेनेची काय अवस्था झाली यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.. परिसरातील मोठमोठ्या खड्ड्यांचे उपस्थित झालेले प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करतील अशी अशा व्यक्त केली… आपल्या कार्यकाळात शीघ्रगतीने असलेल्या रेल्वेचे कार्य आता संथगतीने सुरू असल्याची खंत व्यक्त केली… मात्र राज्यात आणि केंद्रात एकच सरकार आल्याने याला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली…

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदींच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन तथा नामदार श्री.सुधीरभाऊंच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपला प्रवेश केला… त्यांचं सुधीरभाऊंनी भारतीय जनता पक्षात स्वागत केलं.. यामुळे भारतीय जनता पार्टी गडचांदूरला भविष्यात नक्कीच बळकटी, मिळेल अशी आशा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीपजी शेरकी यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार श्री.नारायण हिवरकर, भाजपा तालुकाध्यक्ष कोरपणा, हरीश घोरे, महादेव एकरे, संदीप शेरकी ,विशाल गज्जलवार ,पुरुषोत्तम भोंगळे ,अरुण मडावी ,विजय रणदिवे ,आशिष ताजने प्रमोद पायघन श्री निलेश भाऊ ताजणे ओम पवार राजेंद्र लोणगाडगे भाजपा नेते, श्री शिवाजी शेलकर ज्येष्ठ नेते भाजपा, श्री. महेश घरोटे , श्री. गोपाल मालपाणी, श्री. मनोहर कुळसंगे, इमरान शेख, कुणाल पारखी सुयोग कोंगरे , श्री. संजय ढेपे, श्री. प्रदीप सदनपवार, , अजीम शेख, शेख सर ,माजी नगर अध्यक्षा सौ विजया डोहे सौ अपर्णाताई उपलेंचवार, सौ. शितलताई धोटे , सौ. रंजनाताई निताताई क्षीरसागर, सपना सेलोकर मडावी यांनी सहकार्य केले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील प्रसिद्ध गडचांदूर चा राजा मंडळ येथे महा आरती, अष्टविनायक गणेश मंडळाला भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.. यावेळेस श्री. सतीश बिडकर, उपनगराध्यक्ष श्री.शरद जोगी, श्री. उद्धव पुरी यांच्यासह अनेक अष्टविनायक गणेश मंडळाचे कार्यशील कार्यकर्ते उपस्थित होते… मंडळाच्या वतीने आदरणीय भाऊंचा सत्कार करण्यात आला.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *