Home
Home गडचांदूर / कोरपणा गुरुकुल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गुरुकुल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 14 एप्रिल ला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग व क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागा तर्फे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन करनेवार, वाणिज्य विषयाचे डॉ. राजेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला . प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुराणिक, आभार प्रदर्शन प्रा. सचिन करनेवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर , प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, सविन मडावी शालिक कांबळे, ननिता बुरान, प्रशांत नवले यांनी परिश्रम घेतले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here