गडचांदूरात विविध संघटनेद्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती संपन्न!     

 लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
———————- ——————
⭕विशाल रॅली ने शहर दुमदुमले
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,
स्वतंत्र भारताची सार्वभौम अशी राज्यघटना परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी लिहिली व या घटनेच्या आधारे देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद आशा भेदभावपासून संरक्षण दिले. अशा या महामानवाला 14 एप्रिल ला गडचांदूरातील विविध संघटना चे वतीने अभिवादन करण्यात आले.

गडचांदूर येथील बाबसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी संयुक्त जयंती उत्सव समिती द्वारा हारार्पण करण्यात आले. पुतळा परिसरातील पंचशील ध्वजारोहण श्रीमती अभंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गडचांदूर चे ठाणेदार सत्यजित आमले, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अरुण निमजे, न.पा. चे उप नगराध्यक्ष शरद जोगी, काँग्रेस चे नगरसेवक राहुल उमरे, शिवसेनेचे नगरसेवक शेख सरवरभाई,कोरपना तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष अशोककुमार भगत, एम. आय. एम. चे शहर अध्यक्ष शेख मुन्ना तसेच सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मालार्पण करून विनम्र अभिवादन केले.

दरम्यान, दिवसभर गडचांदूरात भीमजयंतीचे विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी संयुक्त जयंती उत्सवाचे अध्यक्ष प्रा. किर्तीकुमार करमणकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उपस्थिताना बुद्ध वंदना
दिल्यानंतर विशाल बाईकरॅली ला प्रारंभ झाला. गडचांदुर भ्रमण करून या रॅलीचा पुतळ्याजवळ समारोप झाला. सायंकाली सात वाजता विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गडचांदुरातील हजारो भीमअनुयायी सहभागी झाले. रॅलीतील विविध देखावे पाहण्यासाठी सारे गडचांदूरकर एकवटल्याचे दिसत होते. या विशाल रॅलीचा शेवटी पुतळ्याजवळ समारोप झाला.

यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. प्रशांत खैरे, विश्वास विहिरे, दशरथ डांगे, राहुल उमरे, देवानंद मुन व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *