गडचांदुर येथे *बहुजन समाज पार्टी* च्या ‌‌. ‌फलकाचे उदघाटन     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि **बहुजन समाज पार्टी स्थापना दिनाचे* औचित्य साधून बहुजन समाज पार्टी फलक गडचांदुर येथे, गडचांदुर शहर महासचिव सन्माननीय आयु. रामदास बुचूंडे , तसेच संयुक्त जयंती समारोह समिती अध्यक्ष गडचांदुर सन्माननीय आयु. प्रा.कीर्ति कुमार करमरकर यांच्या हस्ते फलकाला पुष्पहार अर्पण करुन फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
त्याचप्रमाणे बसपा चंद्रपूर जिल्हा प्रभारी ‌आयु. भास्कर कामटकर , तसेच आयु. विश्वास विहीरे माजी राजुरा विधानसभा प्रभारी, आयु. रामदास बुचूंडे गडचांदुर शहर महासचिव यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संदेश दिला होता की ज्या संसदेत कायदा होते त्या संसदेत जाण्यास सांगितले. म्हणजे च‌ शासनकर्ती जमात बनण्यासाठी सांगितले. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मान.बहुजनाचे नायक कांशिराम साहेब यांनी दिनांक १४/४/१९८४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी बहुजन समाज पार्टी ची स्थापना केली.आणि भारत देशात हती चिन्ह घेऊन पुर्ण भारत भ्रमण करुन तिसऱ्या क्रमांकाची राजनीतिक पार्टी बनवुन उत्तर प्रदेश मध्ये चार वेळा बहन मायावती यांना मुख्यमंत्री बनवून शासनामध्ये “जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” या नुसार शासनामध्ये बहुजनांना भागीदारी दिली.आणी ६ विश्वविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारक, महापुरुषांच्या नावाने जिल्हे, शाळा, नवीन तयार करून नोकरी ची संधी उपलब्ध करून बेरोजगारी कमी केली. असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय आयु. दशरथ डांगे यांनी केले , आणि आभार प्रदर्शन आयु. रामदास जीवने यांनी केले. या कार्यक्रमाला पंडित डोंगरे , रवि पथाडे, शंकर तांडे, सुभाष शिंदेकर, शंभरकर, गोसाई चांदेकर , त्याचप्रमाणे असंख्य
बसपा कार्यकर्त्यांच्या उपस्थित फलकाचे उद्घाटन संपन्न झाले.
,
.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *