

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕*पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे …डॉ कुलभूषण मोरे*
*अर्थ फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण*
गडचांदूर,,
जागतिक पर्यावरण दिना निमित्त गडचांदूर येथे अर्थ फाउंडेशन तर्फे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली ,चंद्रपूर जिल्हा मध्ये प्रदूषणामुळे वायुप्रदूषण भरपूर प्रमाणात होत आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही …… म्हणून वृक्षारोपण करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे . त्याचाच एक उपाय म्हणून अर्थ फाउंडेशन तर्फे दरवर्षी मिशन ग्रीन अभियान अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी पावसाळा ला सुरुवात झालेली आहे आणि पर्यावरण दिनानिमित्त गडचांदूर येथील मॉर्निंग वॉक या मैदानावर कडूनिंब ,गुलमोहर, करंजी ,अशा प्रकारची सदाहरित व भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली… या प्रसंगी डॉक्टर्स एसोसिएशन तालुका अध्यक्ष डॉ प्रदीप खेकडे , डॉ ,के,आर,भोयर अर्थ चे संचालक डॉ कुलभूषण मोरे , प्रशांत गोखरे , अर्थ चे पर्यावरण-दूत वैभव मुत्यालवार ,मोहित घागरे , संकेत झाडे , गौरव नागोसे उपस्थित होते .
मिशन ग्रीन अभियान अंतर्गत कोरपना व जीवती तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे ….आणि वृक्षारोपण करण्याकरीता जनजागृति तथा प्रोत्साहन करण्यात येणार आहे . मिशन ग्रीन अभियान करिता लोकसहभाग आवश्यक आहे तरी सर्वानी आप आपल्या कार्यालय , शाळा , महाविद्यालय , शेती , घरी वृक्षारोपण करावे. तालुक्यातील सामाजिक व्यक्तीना या अभियाना करीता वृक्षरोपण करीता वृक्षदान करुण सहकार्य करावे असे आव्हाहन अर्थ चे संचालक डॉ कुलभूषण मोरे यानी या प्रसंगी केले आहे .