नांदा येथील सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांच्या संस्थेचे अतिक्रमण हटवा.                                               

लोकदर्शन 👉प्रतिनिधी

⭕नांदा येथील लेआउट अतिक्रमणाच्या विळख्यात

⭕मुख्य रस्त्यावर बांधली शाळेची इमारत

⭕ओपन स्पेस व नाल्यालगतची जागा केली गिळंकृत
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी श्रीमंत औद्योगिक नगरी अशी नांदा ग्रामपंचायतीची जिल्ह्यात ओळख आहे येथील शेत सर्व्हे क्रं. ७४/१ अ व ७४/१ ब ही शेत जमीन चटप यांनी परावर्तीत अकृषक करून लेआऊट टाकून भुखंडाची विक्री केली आहे या दोन्ही लेआऊटमधील तीन मुख्य रस्ते ओपन स्पेस व नाल्यालगतच्या जागेवर सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांच्या संस्थेने अतिक्रमण करीत शाळेकरीता इमारत बांधकामासह पक्के वॉलकंपाउंड करुन शाळेचे प्रवेशव्दार व गेट बसवून लेआऊट बंधिस्त केला आहे लेआऊटमधील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदार कोरपना यांच्याकडे केल्याने संस्थाचालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून खळबळ माजली आहे हायप्रोफाइल व्यक्तींकडून केलेले अतिक्रमण खरोखर काढले जातील का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर स्वतः या हायप्रोफाइल व्यक्तींच्या अतिक्रमणाची चौकशी करीत आहे संस्थेने स्वत:चे अतिक्रमण हटवण्याऐवजी तक्रारकर्त्यांशी संपर्क करुन दबावतंत्राचा वापर सुरु केल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे संस्थेने खरेदी केलेल्या जागेच्या क्षेत्रफळापेक्षा अतिक्रमण केलेल्या जागेचे क्षेत्रफळ जास्त असल्याचे दिसते हायप्रोफाईल लोकांच्या संस्थेचे अतिक्रमण हटविण्याची मागणी लेआऊटमधील प्लाटधारकांनी केली असल्याने कोरपनाचे तहसिलदार कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे

चौकशीत राजकीय हस्तक्षेप
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मौका चौकशी केली असुन तसा अहवाल सादर केला आहे स्थानिक राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने मंडळ अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालात संस्थेला झुकते माप देण्यात आल्याची माहीती आहे प्रभु रामचंद्र विद्यालयात येणारा रस्ता व मुख्य प्रवेशव्दार नाल्याला समांतर सोडलेल्या जागेत मध्ये असतांनाही अहवालात रस्ता व प्रवेशव्दार प्लाट क्रमांक २४ मधून असल्याचे मंडळ अधिकारी यांनी जाणीवपूर्वक खोटे नमुद केले आहे सार्वजनिक रस्ते , ओपन स्पेस व नाल्यालगत समांतर सोडलेल्या जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केले असतांना मंडळ अधिकारी यांनी खोटेपणा दाखवित खाजगी जागा व दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे शब्द अहवालात नमुद केले असल्याने मंडळ अधिकारी शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे स्थानिक ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करुनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी न्याय देण्याऐवजी अतिक्रमण करणार्‍यांची बाजु घेतात तहसिलदार यांनी चौकशी करुन सुनिता लोढीया व अनिल मुसळे यांनी केलेले संपुर्ण अतिक्रमण हटवून न्याय देण्याची मागणी प्लाटधारकांनी केली आहे

नाल्यालगत बांधकाम धोकादायक
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गावाला लागून असलेल्या नाल्याला दरवर्षी पावसाळ्यामध्ये २ ते ३ दा पूर येतो पुरामुळे अनेकांचे नुकसान होते शेतमालकाने लेआऊट टाकताना नाला खोलीकरण व रुंदीकरणासाठी नाल्याच्या समांतर मोकळी जागा सोडेलेली होेती या जागेवर अतिक्रमण करुन इमारत बांधकामासह वाॅल कंपाऊंड केले असल्याने पुराचा धोका आणखी वाढला आहे

संस्थेच्या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
२००८ मध्ये नांदा ग्रामपंचायतीची नविन इमारत ७४/१ अ या लेआऊटच्या ओपन स्पेसवर बांधण्याचे ठरले होते शाळेच्या इमारती समोर ग्रामपंचायत कार्यालय झाल्यास ओपन स्पेस वापर येणार नाही शाळेला ग्राऊंड राहणार नाही म्हणून स्व: हित जोपासता यावे यासाठी संस्थेने खरेदी केलेली जागा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास स्वत:हून दानपत्र करुन लिहून दिली नांदा ग्रामपंचायतीने संस्थेला याबदल्यात कुठलीही जागा , रस्ते ओपनस्पेस बांधकाम करण्यास दिला नसल्याचे सांगण्यात आले

प्रशासन कारवाई नक्कीच करणार
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लेआऊट मधील रस्ते व ओपनस्पेसवर अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी ग्रामपंचायतीसह लेआऊटधारकाची आहे अतिक्रमण काढण्याऐवजी येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अतिक्रमणधारकांची बाजू घेतात हास्यापद वाटते लेआऊटमधील प्लाटधारकांनी एकत्रीत येवुन अतिक्रमण काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे अतिक्रमण करणारे कितीही मोठे हायप्रोफाईल असले तरी त्यांना सार्वजनिक रस्ते , ओपनस्पेस व नाल्यालगतची जागा खाली करावी लागेल अन्यथ‍ा तहसिलदार महोदय अतिक्रमण हटवून कायदेशीर कारवाई नक्कीच करेल

गोकुल बबन बंसोड
तक्रारकर्ता

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शाळेची १४ गुंठे जमीन ग्रामपंचायतीला दिली आहे याबदल्यात ग्रामपंचायतीने संस्थेला जागा दिली आहे तसा करारनामा व ठराव आमच्यात झालेला आहे सुनावणी मध्ये तहसिलदाराकडे करारनामा व ठराव सादर करणार आहे

अनिल मुसळे
प्राचार्य तथा सचिव प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कार्यालयाच्या आदेशावरुन पंचासमक्ष मोका चौकशी करुन अहवाल तयार करुन पाठविलेला आहे प्रकरणात वरीष्ठ स्तरावरुन योग्य ती कारवाई केली जाणार

रामभाऊ चव्हाण
मंडळ अधिकारी , गढचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *