

गडचांदूर (लोकदर्शन 👉 मोहन भारती )
वाढते शहरीकरण, औद्योगिकरण,जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाले आहे त्यांस मानव निर्मित चुकीचे धोरण जबाबदार आहे नैस र्गिक आपत्ती तसेच अ वेळी पाऊस व त्यामुळे शेतकरीचे नुकसान होत आहेत परीणामी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत व त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे.जर पर्यावरण संतुलित करायचे असेल तर झाडे लावणे आवश्यक आहे.व त्यामुळे निसर्ग पुर्वी सारखा होवुन मानवाच्या हिताचा ठरेल असे मार्मिक विचारअनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनी राजुरा चे संचालक प्रशांत चटप यांनी वृक्षारोपण कार्यक्रम मध्ये बोलताना व्यक्त केले,
जागतिकपर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनी, राजुरा च्या वतीने भुरकुंडा येथे कंपनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ,त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते,
तालुक्यातील शेतकऱ्यांना या कंपनीचा भविष्यात फायदा होणार आहे असे सुद्धा प्रशांत चटप यांनी सांगितले,याप्रसंगी विविध प्रकारच्या 50 वृक्षांची लागवड उपस्थित मान्यवर च्या हस्ते करण्यात आली,
याप्रसंगी सरपंच,कुमरे, उपसरपंच,साईनाथ जाधव,संचालक नागेश चटप,बी,डि, ए,संजय शेळके,तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,