सेवाभावी कार्यकर्ते हिच राजुरा विधानसभा काँग्रेसची ताकद आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti

गडचांदूर :– राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद मक्सुद अली आणि राजुरा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख विलास वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेलिब्रेशन हाल, गडचांदूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, काँगेस पक्ष हा स्वातंत्र्य, सामाजिक समता, बंधुत्व आणि धर्मनिपेक्षतेच्या तत्वावर आधारित असून सर्वसामान्यांच्या हितासाठी संघर्ष करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटनारा हा पक्ष आहे. आपल्या पक्षात निष्ठावंत, तन मन धनाने काम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत आणि खऱ्या अर्थाने सेवाभावी कार्यकर्ते हीच राजुरा विधानसभा काँग्रेसची ताकद आहे.
या प्रसंगी चंद्रमणी उमरे, गणेश आदे, दिलीप मडावी, आसिफ महमद, कयुम खान पठाण आदींनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला तर कोरपना तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी शेख अहमद, कोरपना शहर अल्पसंख्याक विभाग काँगेस अध्यक्षपदी निसार एजाज शेख, गडचांदूर शहर अल्पसंख्यक विभाग काँगेस अध्यक्षपदी अब्दुल अनिस कुरेशी, गडचांदूर शहर महासचिवपदी कयुम खान पठाण, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस महासचिवपदी प्रितम सातपुते यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, ऍड मलक शकीर, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, गडचांदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, कोरपना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे, आशिष देरकर, उमेश राजूरकर, पापय्या पोन्नमवार, हंसराज चौधरी, अशपाक शेख विक्रम येरणे, अर्चना वांढरे, रेखा घोडाम, अर्चना आंबेकर, ताज्जुद्दी शेख, करीम भाई, विलास मडावी, केशव डोहे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *