तालुका कोरेगाव, सातारारोड (गोटीचामाळ) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 53 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात विचारांचे अभिवादन…!

 

लोकदर्शन👉 किरण कांबळे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 53 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारारोड गोटीचामाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये मा.तुळशीदास चव्हाण साहेब (ग्रामपंचायत सदस्य सातारारोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठे यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी चेतन आवडे जिल्हा प्रतिनिधी भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा मार्गदर्शन करताना म्हणाले की मुलनिवासी बहुजन समाजातील सर्वच महापुरुषांची फक्त जयंती ,स्मृतिदिन साजरा करुन बहुजन समाजाचा काही फायदा होणार नाही. जेव्हा बहुजन समाज त्या महापुरुषांचे अपुर्ण राहिलेले कार्य पुर्ण करण्यासाठी पुढे येईल तेव्हाच या बहुजन समाजातील महापुरुषांना खरेखुरे व विचारांचे अभिवादन ठरेल.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिला यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनी महापुरुषांचे अपुर्ण कार्य पुर्ण करण्यासाठी कार्य करणार असा संकल्प करण्यात आला यावेळी उपस्थित महिला सौ.अनुराधा चव्हाण,पुजा चव्हाण, संजिवनी चव्हाण,अक्षदा आवडे,दक्षता आवडे,इ उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *