विदर्भवादी नेते डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रुग्णांना फळं वाटप करून साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अग्रणी नेते, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांचा वाढदिवस दिनांक 11/6/2022 रोज शनिवारला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील रुग्णांना फळं वाटप करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी प्राचार्य वामनराव नथ्थुजी मत्ते, प्रतिष्ठित व्यापारी संभाजी लालसरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण येडमे, डॉ. मनीषा कन्नाके, प्राध्यापक अशोक डोईफोडे, पंकज मत्ते, मुख्याध्यापिका मंजुषा मत्ते, आराध्य मत्ते, स्मित सूर, सिस्टर अंजना ढेंगळे, सिस्टर दक्षिणा तेलसे, सिस्टर प्रतिभा काळे, शंकर कोडापे यांच्या हस्ते रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना तसेच ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येडमे व त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *