कौतुकास्पद! सिनूच्या रूपाने पुन्हा एकदा प्रामाणिकतेचे दर्शन – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*⭕लोखंडी पुलाजवळ मिळालेली दागिन्यांनी भरलेली पर्स सिनू इसारपने केली महिलेला सुपुर्द.*

(घुग्गुस /१४ मे)
आजच्या या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय अधूनमधून आपल्याला येतच असतो. असाच प्रामाणिकपणाचा अनुभव काल सकाळी घुग्घुस शहरात पहावयास मिळाला.
येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप हे संध्याकाळच्या सुमारास काही कामानिमित्त लोखंडी पुलाजवळून जात असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस पर्स पडलेली दिसली. त्यांनी उत्सुकतेपोटी त्या पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये एखाद्या महिलेचे काही दागिणे, रोख रक्कम व मोबाईल फोन असल्याचे दिसले. हे बघून इसारप यांनी जराही विलंब न करता चौकशी केली आणि ती पर्स शहरातीलच केमिकल नगर परीसरातील सौ. निलिमा दीपक काळे यांची असल्याचे समजले.
सिनू इसारप यांनी सौ. निलिमा काळे यांना भेटून त्यांची पर्स पोलिसांसमोर जैसे थे परत केली. आपली हरवलेली पर्स मिळाल्याने सौ. निलिमाताईंचाही जीव भांड्यात पडला. आणि त्यांनी सिनू इसारप यांचे आभार मानले.

इसारप यांच्या प्रामाणिकतेची ही बातमी संपूर्ण घुग्घुस शहरात वाऱ्यासारखी पसरली. पैशासह दागदागिने असलेली पर्स सापडूनही सिनू यांनी कुठलाही मोह न ठेवता ती पर्स सुपूर्द केल्याने त्यांच्या प्रामाणिकतेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सिनू यांच्या या आदर्शवत कार्याबद्दल कळताचं भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सुद्धा सिनू यांचं कौतुक केलं.
माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षणआहे. परंतु आज हा गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसं आहेत की जी वेळप्रसंगी कोणताही स्वार्थ न बाळगता अनोळखी लोकांची सुद्धा मदत करतात. ती मदत छोटी की मोठी, आर्थिक की मानसिक हे मुद्दे गौण आहेत. त्यावेळेस महत्त्वाचा असतो तो फक्त माणुसकीचा धर्म! आणि तो सिनूने आपल्या आजच्या कार्यातून दाखवून दिला आहे. सिनू शहरातील आदर्श लोकप्रतिनिधी आहेच, परंतू आजच्या या घटनेने त्याच्यातील चांगुलपणाचेही दर्शन झाले. अशी भावना देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *