वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघा तर्फे आद.ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

 

लोकदर्शन सांगली :👉 राहुल खरात
दि. ८ मे २०२२

वंचित बहुजन आघाडी आणि अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर हाेणार आहे. मंगळवार,दि. १० मे रोजी स.१० ते दु.३ वाजेपर्यंत हे शिबीर लोकांसाठी खुले राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० मे हा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस “स्वाभिमान दिन” म्हणून साजरा केला जातो. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी स. १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत नेत्र व आरोग्य तपासणी व दु.४ वाजता बांधकाम व नाका कामगारांना मोफत व कायम “मध्यान्ह भोजन” देण्यात येणार आहे. तसेच श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मुलांना “वही व पेन” वाटप करण्यात येणार आहेत. तसेच असंंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, प.महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी, जिल्ह्याध्यक्ष महावीर कांबळे, सरचिटणीस उमरफारुख कमरी आदी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे संयोजक संजय कांबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे यांनी केले आहे.तरी या उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *