रमेश हनुमंते यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती,,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव सूर्याचा येथील जेष्ठ शिक्षक रमेश हनुमंते यांची महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे.
महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव च्या वतीने रमेश हनुमंते यांचा मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व निरोप दिला .व शुभेच्छा दिल्या.
रमेश हनुमंते यांची नांदगाव येथे 30 वर्ष 10 महिने सेवा झाली आहेत, सुस्वभावी व्यक्तीमत्व ,संयमी असलेल्या हनुमंते यांचे अभिनंदन करण्यात आले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक वशिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा आभारप्रदर्शन श्यामकांत पिंपळकर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *