कळमना येथे शंकर पटाचे आयोजन.!

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे रामनवमी निमित्ताने बैल जोडी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी शंकर पट हा शेतकऱ्यांचा आवडीचा विषय आहे. शेतकरी व बैल यांचे अतुट नाते आहे. हा उत्सव चांगल्या पद्धतीने व शांततेने साजरा करून शंकर पटाचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक कळमनाचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा प सदस्य सुधाकर पिपळशेडे, साईनाथ पिंपळशेंडे, निंबाळा चे पोलीस पाटील गोपाल पाल, निलेश वाढई, समाधान लडके, मदन पाटील वाढई, दत्तू पिपळशेडे, अनिल बोढाले, महादेव वाढई, संतोष बल्की, पंकज देवाळकर, पंढरीनाथ बल्की, विठ्ठल विददे, भुषण वांढरे, गोलु बल्की, प्रवीण वाढई, दौलत विददे, सुर्यभान भेंडारे, विठ्ठल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *