गुरुकुल महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 23/02/2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभागातर्फे संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार, प्रा. नानेश्वर धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. अनिल मुसळे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला . प्राचार्य आशिष पईनकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक डॉ. प्रशांत पुराणिक तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन कर्णेवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल्ल मुसळे, प्रशांत नवले, संतोष चौधरी, शालीक कांबळे,सविन मडावी,ननिता बुऱ्हाण यांनी परिश्रम घेतले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *