छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी”

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकशवर माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बि.व्हि.बुधवंत, आर.बि.राठोड, एस. ए.महाडिक, डि.आर.नाईकनवरे, एम. एस. गिरी होते.प्रविण क्षीरसागर, बि.बि.मोरे, जि.एम.कावळे, बि.व्हि.बोंडे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बि.व्हि.बुधवंत, आर.बि.राठोड, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस. डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बि.व्हि.बोंडे यांनी केले तर आभार जि.एम. कावळे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *