खिरडी येथे पेवर ब्लॉकचे भूमिपूजन सोहळा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते खिरडी येथे पेवर ब्लॉकचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी. जिल्हा परिषद सदस्य श्री उत्तमराव पेचे , जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई पेचे माजी. सरपंच सौ. अनुसया कोटणाके माजी. उपसरपंच श्री. पुरुषोत्तम राजूरकर, श्री. आनंदराव सलाम, माजी ग्राम पंचायत सदस्य श्री नत्थु मालेकार , श्री रामदास ढवस ग्रामसेविका उईके मॅडम , त. मू. अध्यक्ष श्री धनराज मालेकार , मोहन ढवस, गंगाधर किंनाके, रविंद्र मुक्के , जिल्हा परिषद प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मामिडवार श्री .पांडे , श्री.विठ्ठल गोहने , मारोती आंबडकर , श्री. दीपक खेकारे,तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त ग्रामवासि यांनी सुभाष भाऊ धोटे याचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सुभाष भाऊ धोटे यांनी 50लाखाचे काम दिल्याबद्दल समस्त ग्रामवासी यांनी त्याचे कौतुक केले. ग्रामीण भागाचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. धनराज मालेकर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *