कळमना येथे शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारिणीचे गठण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जि. प. उच्च प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली. सभेमध्ये सौ रंजना दिवाकर पिंगे यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तर श्रावण गेडाम यांची उपाध्यक्ष निवड करण्यात आली. सदस्य म्हणून कवडु गौरकर, शंकर फिसके, रामचंद्र कुकडे, प्रवीण वाढई, सुरेश आत्राम, मंगेश शिरसागर, पेदोर सर, सुनिता धांडे, सपना मेश्राम, अलका गेडाम यांची एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी गावातील शाळा ही शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या प्रबल करण्याकरता मी प्रयत्न करेल शाळेला आय एस ओ मार्क मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार अशी आग्रहाची भूमिका त्यांनी मांडली.
या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, मुख्याध्यापक धानकुटे सर, गोखले मॅडम, दुबे मॅडम, विठ्ठल विदे, सतीश आंबीलकर, बाल्या पिंगे, विठ्ठल नागोसे, सुनील मेश्राम व समस्त गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *