हंसराज अहीर उत्तर प्रदेश निवडणूक प्रचार दौऱ्यावर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

बुलंद ÷पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असून त्यांनी बुलंद शहर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात तसेच सिकंदराबाद विधानसभा क्षेत्रातील ग्राम पचोता येथे मतदारांशी संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष तथा चुनाव प्रभारी सुनील यादव यांची उपस्थिती होती. गाजियाबाद महानगर साहिबाबाद विधानसभा क्षेत्रात तसेच मुरादनगर विधानसभा क्षेत्रातही त्यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री नरेंद्र कश्यप उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाला पुन्हा सत्ता सोपविण्याचे आवाहन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *