जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियानात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून पहिला ठरेल- खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी आदर्श नियमावली बनविण्यात आली आहे. डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून यातून पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून हे अभियान यशस्वी करण्यात येणार असून हे अभियानात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून पहिला ठरेल असे प्रतिपादन खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी यावेळी केले.
चंद्रपूर येथे आयोजित काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस प्रदेश महासचिव विजय नळे, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती तसेच सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाने सध्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले आहे. असे सांगून खासदार बाळू धानोरकर म्हणाले, मतदारापर्यंत पोहोचून त्यांना काँग्रेसचा सदस्य बनविणे हा या अभियानाचा हेतू असून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करत काँग्रेस पक्षाचे बळ वाढवायचे आहे याकरिता ही सदस्य नोंदणी महत्त्वाची असून ती कशी करायची,त्याची पद्धत काय, कोणाची नेमकी जबाबदारी काय हे समजावण्यासाठी व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

अशी असेल ग्रामीण भागासाठी सदस्य नोंदणी प्रक्रिया:
सदस्य नोंदणी साठी असलेल्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची रचना जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, मुख्य नोंदणी अधिकारी, बुथ नोंदणी अधिकारी व त्यानंतर सदस्य नोंदणी या प्रकारचे आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ब्लॉक अध्यक्ष नेमणे, ब्लॉक अध्यक्ष प्रत्येक झेडपी सर्कलमध्ये मुख्य नोंदणीकर्त्याची नेमणूक करतील. मुख्य नोंदणीकर्ता प्रत्येक बुथवर एका महिलेची आणि एका पुरुषाची बुथ नोंदणीकर्ता म्हणून नेमणूक करेल.

अशी असेल शहरी भागासाठी सदस्य नोंदणी प्रक्रिया:
प्रत्येक ब्लॉक अध्यक्ष त्याच्या कार्यक्षेत्रात असणार्या प्रत्येक प्रभागांमध्ये एका मुख्य नोंदणीकर्त्याची नेमणूक करेल. हा मुख्य नोंदणीकर्ता कार्यक्षेत्रातील प्रत्येक बुथवर एका महिलेची आणि एका पुरुषाची बुथ नोंदणीकर्ता म्हणून नेमणूक करेल. तर निमशहरी भागासाठी रचनादेखील शहरी भागासारखीच असेल. या सदस्य नोंदणीमध्ये ब्लॉक अध्यक्षांना मुख्य नोंदणीकर्त्याची नावे 20 जानेवारी पर्यंत जिल्हा अध्यक्षाकडे सादर करायची आहेत. ही नावे देताना निर्धारित एक्सेल शीटमध्येच द्यावयाची आहेत. जिल्हाध्यक्षांना हे माहिती प्राप्त झाल्यावर 21 जानेवारी पर्यंत मुख्य नोंदणीकर्त्याचे नाव, फोन नंबर आणि ब्लॉकचे नाव एक्सेलशीट मधून ई-मेल करायचे आहे. त्याचबरोबर 22 जानेवारी रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्य नोंदणी नोंदणीकर्त्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करायचे आहे. अधिकृत बुथ नोंदणी अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक प्राप्त होईल. या लिंकचा वापर करत गूगल प्ले-स्टोर वरून काँग्रेस सदस्यता नोंदणी ॲप डाऊनलोड करून स्वतःची नोंदणी करावी. प्रत्येक बुथसाठी एक पुरुष आणि एक महिला नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व 6 फेब्रुवारीपर्यंत सर्वांची ॲपमध्ये नोंदणी करावी. नोंदणीच्या सर्व पायऱ्या ओलांडल्यानंतर व सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे सदस्य नोंदणी पत्र देण्यात येईल. 20 जानेवारीपर्यंत ब्लॉक अध्यक्षाद्वारे मुख्य नोंदणीकर्त्याची नेमणूक, 21 जानेवारी पर्यंत मुख्य नोंदणीकर्त्याची यादी जिल्हाध्यक्षांना सादर करणे. 22 जानेवारीपर्यंत जिल्हा अध्यक्षांनी मुख्य नोंदणीकर्त्याची यादी प्रदेशाध्यक्षांना सादर करणे, 22 जानेवारी रोजी मुख्य नोंदणीकर्त्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे, मुख्य नोंदणीकर्त्यांनी प्रत्येक बुथसाठी एक महिला व एका पुरुषाची बुथ नोंदणीकर्ता म्हणून निवड करणे, 6 फेब्रुवारी पर्यंत मुख्य नोंदणीकर्त्यांनी बुथ नोंदणीकर्त्याची आपल्या फोन मार्फत नोंदणी करावी. तर 7 फेब्रुवारी रोजी ब्लॉक अध्यक्षाद्वारे बुथ नोंदणीकर्त्यांचे प्रशिक्षण, 7 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत काँग्रेसपक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविणे. हे या अभियानातील महत्वाचे मुद्दे आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *