महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना प्रमुखांना आदरांजली

लोकदर्शन 👉 मोहन भारती


*सोलापूर दिनांक :- २३/०१/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कामगार सेना कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
प्रारंभी शिवसेना प्रमुखांच्या प्रतीमेस महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज ) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणकरून व पुजनकरून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर कामगार बंधु भगिनींनी शिवसेना प्रमुखांना मानवंदना करून शिवसेना प्रमुख जिंदाबाद , जब तक सुरज चाँद रहेगा बाळासाहेब तुम्हारा नाम रहेगा . अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे . परत या परत या बाळासाहेब परत या अशा घोषणा दिल्या . कामगार व त्यांच्या कुटुंबियांची उपजिवीका चालु आहे . आणि सध्याच्या परिस्थितीत बाळासाहेबांचे विचारच देशाला तारणारे आहेत असे म्हणाले .
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) प्रमुख उपस्थित व कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदरांजली कार्यक्रमात कमलाबाई गुंडैटी , विठ्ठल कुऱ्हाडकर , रेखा आडकी , पप्पु शेख लक्ष्मीबाई ईप्पा , गुरुनाथ कोळी , मिराबाई लच्चुवाले , प्रसाद जगताप , शोभा पोला , संजु शेट्टी , अभिराज कांबळे , हरिदास शेरला , हिरामणी मेरगु बालाजी भंडारी आदिंचा समावेश होता .
=============================
*फोटो मॅटर- शिवसेना प्रमुख मा . बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती या वेळी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी शिवसेना प्रमुखांनी विडी निमित्त कामगार सेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली . सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) दशरथ नंदाल , विठ्ठल कुऱ्हाडकर , रेखा आडकी आदि दिसत आहेत .*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *