४००० वर्षांपूर्वी भारतात होता धातूचा रथ : पाश्चात्यांनी मान्य करून लपवलेला इतिहास

लोकदर्शन 👉

⭕संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
22 जानेवारी 2022.

आपण हे खूपदा ऐकलं असेल की भारतातून सोन्याचा धूर निघायचा! आपल्या देशातली सभ्यता, संस्कृती खूप प्राचीन आहे, सुबत्ता असलेल्या आपल्या देशावर अनेक विदेशी लोकांनी आक्रमण करून आपल्या देशाची संस्कृती आणि इतिहासाची मोडतोड केली!

मुघल असो किंवा पोर्तुगीज किंवा इंग्रज यांनी आपल्या देशाच्या इतिहासाची मोडतोड केली हे आपण ऐकलं आहे. पण इतिहासाची, संस्कृतीची आपल्या सभ्यतेची मोडतोड म्हणजे नेमकं काय??

हेच जाणून घेण्यासाठी आजचा लेख महत्वाचा आहे. डिस्कव्हरी प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिक्रेट्स ऑफ सीनौली नावाची एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे.

दिल्लीपासून साधारण ६७ किमीवर असलेल्या उत्तर प्रदेश इथल्या सीनौली गावाची ही गोष्ट. २००५ साली या गावातल्या गावकऱ्यांना शेतीसाठी खोदकाम करताना जुन्या भांड्यांचे, सोन्याचे धातूचे अवशेष सापडायला लागले.

आणि तिथल्या गावकऱ्यांनी त्या सगळ्या वस्तू साठवायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराची Archaeological Survey of India या सरकारी खात्याला माहिती मिळाली, आणि त्यांनी सीनौली येथे उत्खनन करायला सुरुवात केली. आणि त्यांच्यासमोर जे सत्य उघडकीस आलं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला!

या उत्खननात ४००० वर्षापूर्वी अंत्यसंस्कार केलेले मृतदेह आढळून आले. आपलं महाभारत आणि रामायण हे सुमारे ५००० वर्षं जुनं आहे आणि या उत्खननात मिळालेले अवशेष हे सुमारे ४००० वर्षं जुने असल्याने याला जगातली सर्वात मोठी दुसरी डिस्कव्हरी मानली जात आहे!

या सगळ्या उत्खननात जवळजवळ ११६ मृतदेहांचे अवशेष सापडले आणि त्यांनी त्यावर अभ्यासही सुरु केला. पण काही कारणास्तव हे उत्खनन थांबवावं लागलं, आणि थेट २०१८ मध्ये पुन्हा यासाठी परवानगी मिळाली!

या उत्खननात सापडलेल्या मृतदेहांवर जय प्रकारे अंतिम संस्कार केले गेले ती पद्धत आणि त्या वेळेस वापरलेली सामुग्री, शिवाय त्यातल्या शवपेट्यावर चढवलेलं तांब्याचे आवरण हे सगळं पाहून तिथली लोकं चकित झाली.

शिवाय या उत्खननात ४००० वर्ष जुनी हत्यारं, तलवारीसुद्धा मिळाल्या. तलवारीच्या मुठीवरचं धातूचं आवरण आणि त्यावरचे अवशेष जेंव्हा अभ्यासले गेले तेंव्हा ही गोष्ट समोर आली की हडप्पा मोहेंजो दारोच्या उत्खननात सापडलेल्या हत्यारांपेक्षा ही हत्यारं बरीच आधुनिक होती!

शिवाय सीनौली इथल्या साईटवर जे मृतदेह आढळले त्यातले बरचसे मृतदेह हे महिलांचेसुद्धा होते आणि त्याच्या मृतदेहापाशीसुद्धा अशाच काही आधुनिक हत्यारांचे अवशेष सापडले.

यावरून हा देखील अंदाज काही तज्ञांनी लावला की त्या वेळच्या महिलांमध्येदेखील युद्धकौशल्य होते आणि त्यासुद्धा युद्धभूमीवर धारातीर्थी पडल्या असाव्यात.

पण या सगळ्या उत्खननात खरा ट्विस्ट तेंव्हा आला जेंव्हा ४००० वर्ष जुने असलेले ३ रथ ASI च्या लोकांना सापडले. हे रथ जरी दिसायला वेगळे असले तरी याची रचना ही जगातल्या इतर तत्कालीन संस्कृतीशी मिळतीजुळती होती!

या रथांची रचना, त्यातल्या चाकांवर केलेलं काम आणि त्यातले धातूचे अवशेष पाहता हा रथ नेमका कीती जुना आहे याचा अभ्यास केला गेला, आणि या रथाचा इतिहास लोकांच्या समोर आला.

*ब्रिटिशांनी ज्या प्रकारे एक खोटा इतिहास आपल्यासमोर मांडला, धादांत खोट्या आर्यन संस्कृतीचा प्रसार करायचा त्यांनी प्रयत्न केला त्याला खोडून काढण्याचं काम सीनौली इथे सापडलेल्या रथाने केलं!*

*आर्यांनी रथ सर्वप्रथम भारतात आणले आणि त्यासाठी घोड्याचा वापरसुद्धा त्यांनीच केला ही पोकळ थेअरी कीती चुकीची आहे याची जाणीव हा रथ सापडला तेंव्हा झाली.*

२००५ नंतर थेट २०१८ मध्ये या साईटवर या सगळ्या गोष्टी मिळाल्या. मधल्या कालावधीत हे उत्खनन का थांबले यामागे काही राजकीय हेतू होता का? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण भविष्यात याबद्दल आणखीन गोष्टी समोर येतील अशी आशा करुयात!

नीरज पांडे सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने ही डॉक्युमेंट्री प्रोड्यूस केली असून सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने याचं सूत्रसंचालन केलं आहे.

शिवाय Archaeological Survey of India च्या डॉ. आर.एस बिष्ट, डॉ. बी.बी.लाल, डॉ. व्ही.एन. प्रभाकर अशा तज्ञांनी त्यांचा अनुभव या डॉक्युमेंट्रीमधून मांडला आहे!

या सगळ्या तज्ञांचा अभ्यास पाहता आपल्या देशातल्या प्राचीन संस्कृतीचा, सभ्यतेचा, भारतीय वेदीक आणि सनातन संस्कृतीच्या इतिहासात कीती छेडछाड झाली आहे याचा अंदाज येईल!

*डिस्कव्हरी प्लस या प्लॅटफॉर्मवर ही डॉक्युमेंट्री तुम्ही पाहू शकता. आपल्या देशाचा इतिहास नेमका काय आहे आणि आपल्या शालेय पाठ्यपुस्तकातून कशाप्रकारे चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला याची जाणीव तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघताना नक्की होईल!*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *