अंबुजा सिमेंटने उभारले राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी नो-पार्किंग झोन,,,           

लोकदर्शन। 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕रस्ते अपघात रोखण्यासाठी केला प्रयत्न
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :-
गडचांदूर,कोरपना या राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदाफाटा या मुख्य मार्गावर हल्ली रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.दररोज कुठे ना कुठे किरकोळ तर गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात.याला वाहन चालक व ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून यांच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याचे आरोप होत आहे.रस्त्याच्या बाजूला दुतर्फा उभी मोठमोठी जड वाहने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हारी लागले असून रस्ते अपघातांची श्रृंखला सुरू असल्याचे मत व्यक्त होत आहे.असे असताना अनपेक्षितरीत्या घडत असलेल्या अपघातांवर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिस विभाग गंभीर असल्याचे चित्र आहे.सध्याच्या परिस्थितीत गडचांदूर शहर आणि आजूबाजूला चार आंतराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग आहे.यापैकी मुख्यतः अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांमधून सिमेंटची वाहतूक करणारे मोठमोठे वाहन रस्त्याच्या बाजूला दुतर्फा उभी असतात.यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठ्याप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो.कित्येकदा अपघात ही घडतात,
सदर समस्या सोडविण्यासाठी गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी काही दिवसापूर्वी सिमेंट कंपनीला याविषयी उपाययोजना करण्याची सूचना दिल्याचे कळते.या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम अंबुजा सिमेंट कंपनीने अंबुजाफाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटने भरलेले लोखंडी ड्रम लावून नो-पार्किंग झोनची निर्मिती केली आहे.यामुळे नेहमी रस्त्याच्या बाजूला तासंतास उभ्या वाहनांना आता याठिकाणी उभे राहता येणार नाही.सतत वर्दळ असलेल्या हा रस्ता आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे पुर्णपणे नाही तर काही प्रमाणात अपघातांवर आळा बसणार आहे यात दुमत नाही.एकिकडे या आगळ्यावेगळ्या नो-पार्किंग झोनमुळे अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर झाली तर दुसरीकडे नागरिकांना दिलासा ही मिळाला आहे.ज्या पद्धतीने अंबुजा सिमेंट कंपनीने नो-पार्किंग झोन तयार केले आहे याचे अनुकरण इतर कंपन्यांनी सुद्धा आपापल्या परीने करावे जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टळू शकेल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *