

By : Shankar Tadas
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्मिळ भारतीय दुर्मिळ काळा गरुड आढळून आला आहे. हिमालय पर्वतरांगामध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या या गरुडाच्या महाराष्ट्रात फार कमी नोंदी आहेत. नागभीड येथील पक्षीतज्ञ पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता हा दुर्मिळ गरुड कॕमेरात कैद झाला.
हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने चंद्रपुर जिल्ह्यातील जलाशयात दिसू लागतात. स्थलांतरीत पक्षी बघण्यासाठी पक्षीमित्रांची पाऊले जलाशयाकडे वळतात. नागभीड येथील पक्षीतज्ञ डाॕ. जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रा. निखिल बोराडे, प्रा.अमोल रेवसकर, संजय सुरजुसे हे किटाळी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेले. तलावाचा पाळीवरील झाडावर दुर्मिळ भारतीय काळा गरूड त्यांना आढळून आला. या गरूडाला त्यांनी कॕमेरात कैद केले. भारतात काळा गरूड अशी ओळख असलेल्या या गरूडाचे शास्त्रीय नाव ” इक्टिनिट्स मलाइन्सिस ” असे आहे. हिमालय पर्वतरांगामध्ये या पक्षाचा अधिवास आहे. मैदानी प्रदेशात यांची नोंद अभावानेच आढळते.
***