

लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- १७/०१/२०२२ :-* शाकांभरी पौर्णिमा व श्री,श्री,श्री सुशिलम्मा यांचे पुण्यतिथी उत्साहात व पुर्व विभाग कुचन नगर येथील श्री सुशिलम्मा मठात गुरुमाऊली विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आले.
शाकांभरी पौर्णिमा व श्री गुरुमाऊली सुशिलम्मा यांचे पुण्यतिथी महोत्सव श्री विष्णु कारमपुरी (महाराज) व श्रीनिवास कुसुरकर (महाराज) यांच्या मार्गदर्शना खाली विविध धार्मिक कार्यक्रमे साजरा करण्यात आली सकाळी ९ वाजता श्री गुरुमाऊली सुशिलम्मा व श्री दिगंबर मुनिनाथ महाराज मुर्तीस महाभिषेक त्या नंतर अलंकार पुजा व महापुजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प श्री श्रीनिवास चिलवेरी (महाराज) यांनी सत्संग व ज्ञानबोध प्रवचन केले व त्यानंतर १२ ते 1 महिला मंडळाचे भजनी कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर दुपारी १ वाजता सामुदायिक महाआरती करण्यात आली आणि दुपारी १.३० ते ३.०० वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले गुलालाच्या कार्यक्रमानंतर पुण्यतिथी महोत्सवाच्या सांगता करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास चिलवेरी, दशरथ नंदाल, नागनाथ कारमपुरी, नागार्जून कुसुरकर, मुनिनाथ कारमपुरी, श्रीकांत कुसुरकर, व्यंकटेश कैरमकोंडा, दिनेश पिस्का, निलव्वा चिलवेरी, यमनक्का पिस्का, कविता कैरमकोंडा, अनुसुर्या कारमपुरी, सुनंदा कुसुरकर, कलावती कुसुरकर, प्रियंका कुसुरकर, श्रीदेवी कुसुरकर, कौशल्या मुसकुर, दत्तुबाई गंजी, जनाबाई मुसकुर, यांच्यासह गुरुभक्त भविक मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
===========================
*फोटो मॅटर- शाकांभरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुमाऊली यांचे पुण्यतिथी महोत्सहवात महाआरती करताना भाविक-भक्त व गुरुभक्त दिसत आहेत.*