

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा : रुग्णांना उत्तम सेवा पुरविण्याच्या दिल्या सुचना.
राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी येथील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. येथील आक्सिजन बेड, सामान्य बेड, आक्सिजन सिलेंडर, औषधे, रूग्णवाहीका, जेवण व्यवस्था यासह अन्य सर्व सुविधांचा आढावा घेतला. येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, कोरोना रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी, संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवून उत्तम व्यवस्था करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.
या प्रसंगी सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले, उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुलमेथे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद नगराळे, कोविड केअर सेंटर चे प्रमुख डॉ. अभय मून यासह अन्य डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.