

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा,,
मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु,निकिता सुदर्शन गाडगे हिने ग्रामीण जागरूक अभियान अंतर्गत राजुरा तालुक्यातील वरोडा येथे शेतकऱ्यांना गुरांच्या चाऱ्यावर उपचार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांचे फायदे व महत्त्व पटवून दिले, गुरांच्या चाऱ्यावर उपचार केल्यास चारा दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो व त्यांतुन गुरांना उपयुक्त घटक मिळतात असे सांगितले,
यावेळी प्राचार्य डॉ व्ही, एल,बागडे,पी,एस, चोपकर,डी, डब्ल्यू, चांदेवार, यांनी मार्गदर्शन केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,