क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरीत ५ कोटी च्या विकासकामांचे भूमिपूजन.

गोंडपिपरी :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बाळगून विविध ठिकाणी विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण विशेष प्रयत्नरत आहोत. आज संपन्न झालेल्या ५ कोटी रुपये निधी च्या विकासकामांतून गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना गती मिळेल आणि जनतेला सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात आनखी अनेक विकासकामांसाठी आपण पाठपुरावा करून ती पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
गोंडपिपरी तालुक्यात आमदार स्थानिक विकास निधीतून मौजा गोजोली येथे सुरेश शेंडे ते वसंत इतकलवार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे किंमत १५ लक्ष, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मौजा सोमनपल्ली येथील रामा – ३६९ (हेट्टी सोमनपल्ली) ते चिवांडा रस्त्यावर साखळी क्रम १/०२७ वर ९० मीटर लांबीचा बुडीत पुलाचे बांधकाम करणे ३ कोटी २८ लक्ष ५५ हजार 3) प्रधानमंत्री खनिज शेत्र कल्याण योजना (२०२१-२२) अंतर्गत मौजा बेळगाव येथे वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौजा लाठी येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौजा लाठी येथे हनुमान मंदिर ते गोसाई देव पर्यंत पांदण रस्ता बांधकाम करणे ३० लक्ष, कोठारी- तोहोगव- आर्वी रस्ता प्रजिमा-१८ वरील परसोडी व आर्वी गावात नाली व पेंग्विन चे काम करणे ८० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
या प्रसंगी कृ.उ.बा.स. सभापती सुरेश चौधरी, उपसभापती अशोक रेचानकर, काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुकाध्यक्ष सरपंच संघटना देविदास सातपुते, नामदेव सांगडे, फिरोज पठाण, वेळगाव चे सरपंच धिरेंदे नागपुरे, लाठी चे उपसरपंच साईनाथ कोडापे, माजी सरपंच नरेंद्र वाघाडे, सरपंच विनोद जगताप, नितेश मेश्राम, प्रवीण लोखंडे, संतोष तलांडे, बबलू कुळमेथे, गौरव वासेकर, सोनू पाल, उपविभागीय अभियंता वैद्य, कनिष्ठ अभियंता नैताम, कनिष्ठ अभियंता कोवे मॅडम यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *