

लोकदर्शन 👉 मोहन भारती
नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येतात, पण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे
वैष्णोदेवी मंदिरात २०२२च्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक भाविक देखील जखमी झाले आहेत. त्यांना वैष्णोदेवी नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचलचे होते. त्यादरम्यान, चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
मात्र काही तरुणांमधील वाद हे या भीषण अपघाताचे कारण होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेट क्रमांक तीनवर काही तरुणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर काहींना धक्काबुक्की करण्यात आली आणि यादरम्यान लोक पळू लागले. या वादातून चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.