

लोकदर्शन 👉
नागपूर, ३० डिसेंबर २०२१ : शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन ३१ डिसेंबर २०२१ ला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते आभासी पद्घतीने संपन्न होणार आहे.
आभासी पद्धतीने (ऑनलाईन) उत्तर नागपूरातील ब्लाँक क्रमांक १३, १४ आणि १५ मध्ये नागपूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सिमेंट रस्ता, संरक्षण भिंत, वाचनालय ईमारत, बगीचा सौंदर्यीकरण, गडरलाईन, समाजभवन, ग्रीन जीम, खडीकरण इत्यादी एकूण ३७ विकास कामांवर १३ कोटी ६४ लक्ष रुपये खर्च होणार आहेत.
विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचे शुभहस्ते ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता आभासी पद्धतीने होणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला आभासी पद्घतीने हजर राहण्याकरिता https://meet.google.com/rdt-hfkw-pzi या लिंक वर क्लिक करून सहभागी होण्याचे आवाहन नागपूर सुधार प्रन्यास ने केले आहे.