शरद पवारांकडून मोदींचं कौतुक; म्हणाले आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांकडे ही शैली नव्हती* 

शरद पवारांकडून मोदींचं कौतुक; म्हणाले आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांकडे ही शैली नव्हती*                लोकदर्शन   👉  मोहन भारती
——————————————– rराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे, असं पवारांनी  बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं. या कार्यक्रमात इतर अनेक मुद्द्यांवर पवारांनी आपलं मत मांडलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, मोदींनी एखादं काम करायचं ठरवल्यानंतर ते काम पूर्ण करूनच थांबतात. मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतात. एकदा त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही, याची ते काळजी घेतात.  धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्रितपणे काम करून शकतील? यावर पंतप्रधान भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे. ही शैली माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडं नव्हती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात सुडाचे राजकारण कारायचं नाही, असं माझं आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं मत होतं. तत्कालीन सरकारमध्ये मोदींशी संवाद साधणारा माझ्याशिवाय दुसरा कोणता मंत्री नव्हता, असं पवारांनी म्हटलंय.

“राज्यात 2019 साली झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला सत्तेपासून वंचित रहावं लागलं. शरद पवारांनी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला एकत्रित आणत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. पण ज्यावेळी हे सरकार स्थापन झालं नव्हतं, त्यावेळी आपली आणि पंतप्रधान मोदींची सत्ता स्थापनेच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली.””राज्यात भाजपनं आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती, पण आपण त्याला नकार दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *