जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,

पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना शासन निर्णयानुसार व कोरोना संसर्गाच्या नियमावलीच्या अधिनस्त राहून करण्यात आली ,यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची रचना व त्यांची कर्तव्य अधिकार या विषयी ची संपूर्ण माहिती उपस्थित पालकांना देण्यात आली तसेच शाळा विकासात शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्यात आली यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात सर्व उपस्थित पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली ,
अध्यक्ष म्हणून श्रीराम नथ्थु पाचभाई तर उपाध्यक्ष म्हणून वनीता ब्रह्मकिशोर पिंपळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सदस्य म्हणून संगीता संदीप मडावी प्रदिप महादेव आंबेकर मनीषा कैलास कुचनकर प्रदीप सुभाष बावणे श्रीकांत नागोबा निखाडे रसिका सुभाष राऊत शंकर महादेव मोहितकर रत्नमाला मनीराम झाडे ज्ञानेश्वर गोविंदा ढवळे विठ्ठल बालाजी मडावी जयेंद्र बाबुराव बावणे कलावती किशोर गुरनुले यांची पालकांमधून निवड करण्यात आली तसेच सदस्य सचिव म्हणून पांडुरंग करनूजी बुरांडे तर शिक्षण प्रेमी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम दत्तुजी भोंगळे सर आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणून काकासाहेब बाबुराव नागरे यांची निवड करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप बालाजी पावडे माजी सरपंच मोहपतराव मडावी व पालक उपस्थित होते तसेच अशोक पडाल शिवाजी माने अनिल राठोड व नितीन जुलमे हे शिक्षक उपस्थित होते
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *