कुंभकर्णालाही लाजवणारे सरकार

By : Mohan Bharti

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वज्रप्रहार
– अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान सभेत चर्चा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णालाही लाजवले अशा पद्धतीने झोपलेले आहे, नव्हे झोपेचे सोंग घेऊन आहे, असा वज्रप्रहार विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

आपण शाळेत शिकत असताना आपल्या शिक्षक नेहमी म्हणायचे की महाराष्ट्रात एकविसाव्या शतकात ‘जमिनो के और कमिनो के ज्यादा भाव होंगे’. अशी परिस्थिती महाराष्ट्रात आज खरच निर्माण झाली आहे. महिलांवरील सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी तर राज्याला लाज आणली आहे. पण गृहविभाग यावर विचार करायलाही तयार नाही. दिलीप वळसे पाटील हे सरकारमधील केवळ नामधारी गृहमंत्री आहेत. कार्यकारी गृहमंत्री तर अनिल परब असल्यासारखे वागतात असे ते म्हणाले. पोलिस दलात गृहमंत्र्यापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच भ्रष्टाचारात माखले आहेत, असा घणाघात आ. मुनगंटीवार यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने वकिलांनाही फसविले. वकिलांसाठी स्टायपेंड, निवृत्ती, वकील भवनाचे वजन देण्यात आले होते. हा वचननामाच सरकारने केराच्या टोपलीत फेकला आहे. पोलिस विभाग आता खंडणी वसुली विभाग बनला आहे. राज्यातील लहान मुली, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक अगदी कारागृहातील तृतीयपंथीही असुरक्षित असल्याकडे त्यांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.

सरकारी आरोग्य यंत्रणेचा विचार केला तर सरकारीवर पडतेय भारी खासगी आरोग्य यंत्रणा सारी अशी स्थिती आहे. कोविड साथीच्या काळात सरकारी दवाखान्यांमध्ये औषधी, ऑक्सिजन, सोयी-सुविधांची वानवा होती. खासगी दवाखाने मात्र कमाई करीत होते. त्यांच्या अव्वाच्यासव्वा बिलवसुलीवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक औषधांसाठी वणवण भटकत होते. सरकारमधील मंत्री मात्र सारेकाही एज्नॉय करीत होते. एकुणच काय तर महाविकास आघाडीचे सरकार आभासी सरकार आहे. मुख्यमंत्री जागेवर नाहीत. मंत्री भ्रष्टाचारांमध्ये गुंतले आहे. नेते आपसातील राजकारणामुळे एकमेकांना संपवायला निघाले आहेत. यात नुकसान मात्र राज्याचे होत आहे असे आ. मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.

विधिमंडळाच्या माध्यमातून आपण सरकारला जागेवर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. केवळ विरोध करायचा म्हणुन कोणताही मुद्दा सभागृहात उपस्थित करीत नाही. मात्र त्यानंतरही सरकार केवळ भ्रष्ट्राचार आणि अनाचारातच बरबटलेले राहणार असेल, तर महाराष्ट्रातील जनता तीनही पक्षांना घरी बसण्याचे जबरदस्त व्हॅक्सिन दिल्याशिवाय राहणार नाही, असे आ. मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *