छत्रपती शिवाजी महाराज जनकल्याणासाठी झटण्याची खरी प्रेरणा. — पालकमंत्री विजय वडेट्टीवार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕राजुरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण.

राजुरा :– या जगात दोनच मोठे राजे झालेत ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांमध्ये प्रचंड साम्य आहे. दोघांनीही या देशात स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी आयुष्य वेचले आहे. राजुरा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. हा सर्वांसाठी प्रेरणादायी सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जनकल्याणासाठी झटण्याची खरी प्रेरणा आहे. जनसेवा करताना महाराजांच्या आचार विचारातून दररोज नवी ऊर्जा मिळते. ते सर्व धर्मीयांचा आदर करणारे व रयतेच्या कल्याणासाठी झटणारे राजे होते असे प्रतिपादन पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी राजुरा येथे व्यक्त केले.
राजुरा नगर परिषदेच्या वतीने नगरीच्या सौंदर्यीकरणात आणि गौरवात भर घालणारे “श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला होता या प्रसंगीं नामदार वडेट्टीवार बोलत होते.
या प्रसंगी नामदार वडेट्टीवार यांनी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या कार्याचा गौरव केला. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात या शहरात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. आणि अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांच्याच नेतृत्वाखाली पुर्ण होण्यासाठी जनतेने नगराध्यक्ष अरुण धोटे, आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे हात मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती खासदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ घोटे, प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष अरूण घोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शिक्षण सभापती राधेश्याम अडानिया, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, स्वच्छता व आरोग्य सभापती आनंद दासरी, महिला व बालकल्याण सभापती वज्रमाला अ. बतकमवार, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहने, संध्या चांदेकर, दिपा करमनकर, साधना भाके, शारदा टिपले, उज्वला जयपूरक, राजेंद्र डोहे यांची उपस्थिती होती.
या सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसीलदार हरिष गाडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अशोक देशपांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष अशोक राव, सय्यद सकावत अली, रामभाऊ ढुमने, विकास देवाळकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, अॅड प्रशांत अटाळकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, शेख मेहमूद मुसा, केशवराव ठाकरे, प्रभाकर चन्ने, गोपाळराव बुरांडे, कुंदा जेणेकर, निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, योगिता मटाले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, सारंग गिरसाळवे, मतीन कुरेशी, उमेश गोरे, जगदीश बुटले, कोमल पुसाटे, पत्रकार बांधव, शहरातील नागरीक प्रतिष्ठित नागरिक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकातून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. संचालन आनंद चलाख यांनी केले तर आभार प्रदर्शन बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *