

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे पोलीस स्टेशन गडचांदूर च्या वतीने 16 डिसेंबर ला पोलीस काका व पोलीस दीदी उपक्रम 2021 अंतर्गत शाळा व महाविद्यालयातील मुले मुलींकरिता कायदा व सुव्यवस्था या विषयावर ठाणेदार सत्यजित आमले महिला पोलीस उप निरीक्षक निशा खोबरागडे व सुषमा अडकिने यांनी सखोल मार्गदर्शन केले,
पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांनी शालेय मुलींना मार्गदर्शन करताना मोबाईल चा गैरवापर न करण्याचा सल्ला दिला, पुस्तकावर जिवापाड प्रेम करून अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्यावी असे सांगितले, मुलींनी अनोळखी युवकांसोबत जाऊ नये,जास्त बोलू नये, संगत चांगली असावी, एखादा युवक त्रास देत असेल तर तात्काळ पोलीस दीदी ला सांगावे,अशा अनेक सूचना केल्या,
निशा खोब्रागडे, व सुषमा आडकीने यांनी मुलींना मार्गदर्शन केले, व सावध राहण्याचा सल्ला दिला,
याप्रसंगी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ,स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी, व्ही, सी, विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, प्रा, नंदाताई भोयर,प्रा, आशीष देरकर, प्रा,प्रदीप परसुटकर,प्रा ,प्रशांत पवार,उपस्थित होते, संचालन व आभार प्रदर्शन प्रा, आशीष देरकर यांनी केले, याप्रसंगी शालेय व महाविद्यालया तील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,