स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.                                                           

लोकदर्शन 👉

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिनांक 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्वातंत्र्यावर आधारित विविध स्पर्धेचे, प्रश्नमंजुषा ,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीत ,गीत गायन स्पर्धा ,घेण्यात आली या स्पर्धेत विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
वरील स्पर्धाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी उपलब्ध होते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती संवर्धनाची प्रेरणा मिळते याचा विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात व्यक्तिमत्व विकसित होऊन सुजान नागरिक निर्माण होते असे मत मुख्याध्यापक काळे यांनी व्यक्त केले. स्पर्धेसाठी पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे, सुरेश पाटील, नामदेव बावनकर, बोबडे सर, शंभरकर मॅडम ,चौवरे मॅडम, गोपंमवार मॅडम, वासेकर सर, मांढरे सर, मरस्कोल्हे सर, आडे सर, किन्नाके सर, चटप मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केलेत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कुमार ताकसांडे तर आभार प्रदर्शन राजेश मांढरे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *