नैतिकतेच्या आधारावर रामपूर काँग्रेसचे पोटनिवडणुकीत शिवसेनेला समर्थन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने शिवसेनेचे एक सदस्य अपात्र ठरविण्यात आले. त्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. रामपूर ग्रामपंचायतीचा कार्यकाल आता फक्त १५ महिणे शिल्लक आहे. त्यामुळे त्या एका जागेसाठी निवडणूक होऊ नये म्हणून स्थानिक सर्वपक्षीय नेते प्रयत्नरत होते पण काही हौशी नेत्यांनी गावाची एकता खंडीत करून निवडणूक होण्यावरच अधिक भर दिला. परंतु काँग्रेसने मात्र आपला शब्द पाडत नैतिकतेच्या आधारावर त्या एका जागेसाठी शिवसेनेला समर्थन करून दिलदारपणाचा परिचय करून दिला.
राजकारणात निवडणूका येतात जातात मात्र केवळ १५ महिने ग्रामपंचायतचा कार्यकाल शिल्लक आहे हे लक्षात घेऊन वेळ आणि पैसाचा अपवय टाळावा या उदात्त हेतूने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन अन्य सर्व पक्षीयांशी चर्चा करून शिवसेना उमेदवाराला बिनविरोध निवड करण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. मात्र गावातील काही स्थानिक हौशी लोकांना हे सर्व गोडीगुलाबीचे, एकोप्याचे वातावरण बघवले नाही. आणि त्यांनी आपल्या अपरिपक्वतेचे प्रदर्शन करीत रामपूर येथे पोटनिवडणुकीचा घाट घातला. या कुरघोडीच्या राजकारणाला बळी न पडता रामपूर काँग्रेसने मात्र आपला शब्द पाडत त्या जागेवर काँग्रेस उमेदवार न देता शिवसेना उमेदवाराला नैतिकतेच्या आधारावर आपले समर्थन करीत पाठिंबा जाहीर केला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत गावात तोडफोडीचे आणि घाणेरडे राजकारण करणाऱ्या या हौशी नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना रामपूरची जनता धडा शिकविण्यासाठी सज्ज असून निवडणूक निकालानंतर या सर्व हौशींची नशा उतरलेली पहायला मिळणार हे मात्र नक्की खरे ठरणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *